सासवड : बारामती लोकसभा निवडणुकीतून शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात गरळ ओकत होते. आणि २ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारेंचा सूर बदलला आहे.
इंदापूरची जनता अजित पवारांना साथ देणार नाही. मी जनतेचा कौल घेतला आहे. त्यामुळे जनता त्यांच्या विरोधात आहे. अजित पवारांना मतं मिळणार नाहीत. बारामतीचा सातबारा पवारांकडे नाही. अजित पवारांचा उर्मटपणादेखील अजून गेलेला नाही. त्यामुळे जनता अजित पवारांच्या विरोधात आहे. असं शिवतारे म्हणाले होते.
त्यानंतर आज सासवडमधील मेळाव्यात शिवतारेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि बारामती लोकसभेतून माघार घेतली. मुख्यमंत्र्याच्या ओएसडीच्या एका फोनमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री शिंदेंना अडचण होऊ नये, म्हणून माघार घेतल्याचं विजय शिवतारे म्हणाले आहेत. आता माघार घेतल्यानंतर त्यांनी लगेच सुनेत्र पवारांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या आहेत.
“अजितदादांच्या हातून काही चुका झाल्या असतील काय झाले असतील पण आज मोठं ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं,असा ठराव आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिएक्शन्स होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्या नंतर सर्व लोकांनी एक मुखाने घोषणा दिल्या”, असंही शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतली; स्पष्टच सांगितलं काय घडलं
-रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”
-अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार