बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा राज्यातील सर्वाधिक हाय होल्टेजची लढत होणार आहे. या लढततीमध्ये बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेवर शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे हे ठाम आहेत. अपक्ष म्हणून शिवतारे निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यातच आता पवार कुटुंबातील या फुटीचा फायदा घेण्याचा हेतू विजय शिवतारे यांनी बोलून दाखवला आहे.
“बारामती कोणाचा सातबारा नाही. पवार कुटुंबात मते विभागून जातील आणि आपल्याला याचा फायदा होईल”, असं गणित विजय शिवतारे यांनी मांडलं होतं. आता पुन्हा एकदा शिवतारेंनी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं बोलून दाखवलं आहे.
“केवळ जनतेची लढाई म्हणून, गुंडशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे बापू जनतेची लढाई म्हणून यात उतरला आहे. देवाला मी सांगितलं तू आशीर्वाद दे, जनतारुपी मतदान होऊ दे, महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झाला आहे. कोण कुठे जात आहे? कोण काय करत आहे. याबाबत नवीन आशा सर्वसामान्य लोकांच्या मनात झाली आहे. एक नवीन पर्याय, नवीन पर्व विजय शिवतारेंच नव्हे तर सर्वसामान्य सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा. कुणाला पाडण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी नव्हे तर पवार पर्व संपवण्यासाठी, हे पवार आडनाव नाही, तर ही घराणेशाही आहे. झुंडशाही आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुबियांची हुकूमशाही संपवण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध आहे. या निवडणुकीत मी माघार घेणार नाही. येत्या १२ एप्रिलला अपक्ष अर्ज दाखल करणार आणि निवडणुकीच्या रिंगणार उतरणार.”
विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा भाजपच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितलं होतं. आता थेट पक्षाच्या विरोधी भूमिका घेऊनही निवडणूक लढण्याची तयारी शिवतारे यांनी दाखवली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर
-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं