पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार कुटुंबात असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकर कायम पवार कुटुंबाला साथ देतात, आजवर त्यांनी साहेबांना नंतर मुलीला विजयी केल आहे, आता सुनेला विजयी करा, असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानावर बोलताना शरद पवार यांनी “बाहेरचे पवार आणि मूळचे पवार यांच्यामध्ये फरक आहे” म्हणत सुप्रिया सुळे मूळ तर सुनेत्रा पवार या विवाह नंतर पवार झाल्याचा अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं. काका पुतण्यांच्या या विधानावरूनच मोठा गदारोळ राजकीय क्षेत्रात उडाला आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार या माध्यमांशी बोलत असताना शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी बोलताना त्यांनी “माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती, त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो” असं सांगितलं आहे.
सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
मतदारसंघातील लोकांमध्ये मोठा उत्साह असून जिथे जाईल तिथे लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवला मदत होते. त्यामुळे दोन्हीकडे एकच सरकार असणे गरजेचे आहे. बारामती मतदारसंघांमध्ये जो विकास झाला आहे, तशाच प्रकारचा विकास इतर तालुक्यांमध्ये देखील घडवायचा आहे. बारामतीमध्ये अनेक कंपन्या आहेत, महिलांना रोजगार मिळाला आहे. तसाच विकास मतदारसंघातील इतर ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाबाबत विचारताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
-“नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला लोकसभा मतदारसंघ
-आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार
-बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान
-पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी