पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभांना वेग आला होता. तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या लेकीसाठी प्रचारसंभांचा धडाका लावला. बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अनेक सभा झाल्या त्यानंतर रविवारी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सांगता सभा झाल्या. बारामतीच्या नागरिकांनी सभांना प्रचंड गर्दी केली होती. बारामती लोकसभेचे मतदान ७ मे रोजी होणार आहे.
शरद पवार यंदा मुंबईऐवजी बारामतीच्या माळेगावमधून मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून बदलून मुंबईमध्ये घेतले होते. मात्र यंदा शरद पवार पुन्हा एकदा बारामतीमधून लोकसभेचे मतदान करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या बारामती लोकसभा निवडणुकीचा सामना हा अटीतटीची होत आहे. त्यातच पवार कुटुंबातील २ सदस्य आमनेसामने आले असल्याने ही निवडणूक आता पवार कुटुंबाच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची ठरलेली आहे. त्यामुळे शरद पवार हे पुन्हा बारामतीमध्ये मतदान करणार असल्याचं बोललं जातं. तसेच शरद पवार हे आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत.
शरद पवार हे १९६७ पासून बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. २०१४ पर्यंत शरद पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करत होते. मात्र, पक्षात पडलेल्या फूटीनंतर शरद पवारांनी पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ते मतदान करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
-अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?
-‘सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार’; मोहोळांचं आश्वासन