पुणे : राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्या आयोजित केला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन पक्ष फोडून आले. ते त्याचे कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
“काही जण दमदाटी करत आहेत. पण त्यांना हे माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. सुदैवाने आज बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आपण नक्कीच जास्त जागा जिंकू. काही जणांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत.”
महत्वाच्या बातम्या-
Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर
-लोकसभेच्या तोंडावर देशातील डॉक्टरांचा मोठा निर्णय; देशात पहिल्यांदाच होणार दबाव गट
-‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण
-आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित
-मोहोळांसाठी कसब्यात भाजपची मोर्चेबांधणी, ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा रासनेंनी व्यक्त केला निर्धार