पुणे : राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबात विभाजन पहायला मिळाले आहे. पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन पक्षांत विभागणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘अजित पवार हे विकास करणारे कामाची व्यक्ती आहे’, असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यावरुन रोहित पवारांनी भारताच्या इतिहासात ब्रिटिशांनी केलेल्या विकासाचा दाखला देत अजित पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
“काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे असे म्हणून ब्रिटीशांनी विकास केला. म्हणून सामान्य जनता ब्रिटीशांबरोबर गेली असती का?” असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आणखी काय म्हणाले रोहित पवार?
“ब्रिटीशांनी जी वृत्ती वापरून घर आणि माणसे फोडली तीच वृत्ती आज वापरली जात आहे. विकासाचा विचार केला तर बारामतीमध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी आणि धरणे शरद पवार यांच्यामुळे झाली आहेत. तरी देखील विकासापेक्षा विचार अधिक जास्त म्हत्वाचा आहे. भाजपचे नेते शरद पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहे. पवार कुटुंबातील माणसे फोडून भाजपच हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत असून जनतेला हे पटणार नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून तीन लाख मतांनी निवडून येतील.”
महत्वाच्या बातम्या-
-“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव
-…म्हणून भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी दाखवला जिवंत खेकडा
-पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस