बारामती : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना रंगत असल्यामुळे आधीच या लढतीची राज्यभर चर्चा आहे. या हाय होल्टेड लढतीमध्ये आता बहुजन समाजवादी पक्षाने उडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती या चार मतदारसंघांत बहुजन समाज पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलखतींचेही आयोजन केलं आहे.
बहुजन समाज पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुख्य झोन प्रभारी, महासचिव महाराष्ट्र प्रदेश डॉ. हुलगेश चलवादी आणि झोन प्रभारी सचिव महाराष्ट्र प्रदेश सुदीप जी. गायकवाड या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. गुरुवारी, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता, पुणे इंटरनॅशनल स्कूल टिंगरेनगर याठिकाणी मुलाखती पार पाडणार आहेत.
बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या लढतीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचं वारंवार महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. त्यातच बसपाही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रावहिनी यांच्या लढतीत आता मायावतींच्या बसपाची एन्ट्री झाल्याची मोठी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही दडपशाही नाही, लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे
-“विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे” -मुरलीधर मोहोळ