बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. काल (रविवारी) बारामती लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही गटाच्या सांगता सभा पार पडल्या. या महविकास आघाडीच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांवर टीका करण्यात आली. त्यावरुनच महायुतीच्या (अजित पवारांच्या) सभेतून त्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीकेला उत्तर देताना खासदार आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
‘मोदी-शाहांवर टीका करून, संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होणार नाही. महिला उमेदवार लोकसभेत गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन मागे-मागे जाणार? आता अजित पवार काय हातात पर्स घेईल का? सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातात का तिथे?’ असे सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले की, ‘अरे मला तर अशी उत्तरे देता येतील की, तुम्हाला पळता भई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल. दुसरीकडे कुठं थांबणार नाहीत. आपण म्हणतो जाऊ दे, आपलीच बहीण, भावंडं आहेत. आपलीच लोकं आहेत. हे असं चालणार नाही. इथे जर मी खुर्च्या टाकल्या असत्या तर या सभेचे रूप चौपट ते पाचपट झालं असतं. काहींना अशी गर्दी होणार नाही, बारामतीकर प्रतिसाद देणार नाहीत, हे समजल्यामुळे त्यांनी खुर्च्या टाकल्या होत्या.’
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?
-‘सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार’; मोहोळांचं आश्वासन
-बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले
-“मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंचा डाव”; आढळराव पाटलांचा गंभीर आरोप