बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार लढत होत आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य आमनेसामने येत निवडणूक लढत आहेत. अवघ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील सर्व सदस्य निवडणुकीच्या प्रचाराला मैदानात उतरले आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे.
“कोण एग्रो-फिग्रो दम देत असेल तर त्यांना घाबरू नका. आपला दम लई भारी आहे. मी ऊस घेऊन जाईन तुमचा… अफवांवर विश्वास ठेवू नका. कार्यकर्त्यांना दम देऊ नका. उद्या निवडणूक झाली की इथं मीच आहे. इथं कोणी येणार नाही. सगळे परदेशात जातील. इथं सगळी गर्मी आहे म्हणतील आणि परदेशात जातील. आता सगळे उगवले आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगवल्यासारखं सगळे घरचे आले आहेत. एका एकेकाला… चार दिवस सासूचे अन् चार दिवस सुनेचे असतात. आमच्या घरात तर सुनेलाच परक मानलं जातं. सासऱ्याचे दिवस राहत नाहीत. कधीतरी सुनेचे दिवस येतील”, असं म्हणत अजित पवारांनी पवार कुटुंबातील सुळेंचा प्रचार करणाऱ्या सदस्यांवर टीका केली आहे.
“कुणीच काही करू शकत नाही. मी एक तर कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर मी कुणाला सोडत नाही. कुणीच माझ्या नादी लागू नका. मी खपवून घेणार नाही. माझ्या लोकांना दमदाटी करू नका मस्ती दाखवू नका मस्ती मला जिरवता येते. मी कुणाला म्हणत आहे समझनेवाले को इशारा काफी है”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप
-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले
-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…
-‘…मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी मोदींना का यावं लागलं?’; वाघेरेंचा बारणेंना खोचक सवाल