बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगला रंग चढला आहे. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इंदापूर येथे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.
शिवसेना म्हणून संपर्क प्रमुखांना शिवसेनेच्या बैठका घेतल्या आणि संपर्क प्रमुखांना मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या उमेदवाराला शिवसेनेची मोठी मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. आजपासून बारामती लोकसभेमध्ये शिवसेनेच्या बैठका होणार आहेत. मतदारसंघात बैठका घेऊन महायुतीचं संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. बारामती लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका होणार असून पक्षाच्या संपर्क प्रमुखांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू?, पण आता मी बच्चा राहिलो नाही” -उदयनराजे भोसले
-“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत
-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात