बारामती : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबातील वाद काही संपेना. विशेष म्हणजे खासदार शरद पवार यांनी सोमवारी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असल्याचं सांगितलं आहे. शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
“४ दिवस सासूचे संपले, आता सुनेचे ४ दिवस येऊ द्या. ४० वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत”, असा सणसणीत टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांन प्रत्युत्तर दिलं आहे.
“ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग
-जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज
-“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार