बारामती : राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजकारणात बारामती हे नाव चांगलेच चर्चेत आहे. राजकारण म्हटलं की पहिला शब्द येतो तो म्हणजे बारामती आणि पवार कुटुंब. पवार कुटुंबातील अनेक सदस्य राजकारणामध्ये आहेत. पवार कुटुंबात सध्या ३ खासदार २ आमदार आणि मंत्रिपदही आहे.
राज्यभा खासदार शरद पवार, आमदार आणि उपुमख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नुकतीच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेचे खासदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ जून रोजी (काल) सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकही अर्ज आला नाही त्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून त्यांनी हा अर्ज भरला होता. त्यामुळे आता बारामतीच्या पवार कुटुंबामध्ये सध्या ३ खासदार, २ आमदार आणि मंत्रिपदही मिळाले आहे. दरम्यान, पवार कुटुंबाला घराणेशाहीवरुन टीका करण्यात येते. त्यातच आता पवार कुटुंबात इतकी पदे असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?
-“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक
-ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार
-आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
-पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू