बारामती : लोकसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातून माहयुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विकास कामाचं कौतुक केले आहे.
“बारामतीचा विकास हा अजित पवारांंच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्यांच्या कल्पनेतून झाला आहे. घडाळ्याला दिलेलं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं मत आहे. ‘मोदींना मत म्हणजेच विकासाला मत'”, असं सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे.
“गेल्या १० वर्षात बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्रांच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या २५ वर्षात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचं मॉडेल म्हणून समोर आलं आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे तर बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे.”
🔰18-04-2024 🛣️ पुणे ⏱️ बारामती लोकसभा | सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा #pune #baramati #elections2024 https://t.co/24vdhJkTjA
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 18, 2024
“गेल्या १० वर्षांपासून जीव झोकून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर
-Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली
-अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’
-आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपदेश नक्की वाचा…