बारामती : राज्यात विधानसभा निवडणूक सुरू असून आज प्रचार सभांच्या तोफा थंडावत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगता सभा पार पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद लावर गटाकडून बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही भावनिक राजकारण झाल्याचे पहायला मिळाले. आजच्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांना समस्त बारामतीकरांची तुफान गर्दी केली असून दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महाविकास आघडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं आहे. या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या दाखवून दिले आहे. इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आणि घटना दुरुस्तीचा डाव हाणून पाडला. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते लोकांना अमिश दाखवतात, असा गंभीर आरोप आज शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार करायचे. आज राज्यात महिला सुरक्षित राहिली नाही. महाराष्ट्रातल्या 64 हजार महिला कुठे गेल्या? , असा सवाल यावेळी शरद पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही जेवढं बारामतीसाठी केलं, त्यापेक्षा जास्त क्षमता ही युगेंद्रमध्ये आहे. देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, असे शरद पवार अजित पवारांना उद्देशून म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही
-गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ
-कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर