पुणे : अवघ्या देशाचं लक्ष लागून असणाऱ्या बारामती विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना रंगला. यामध्ये काका अजित पवार तर त्यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत पहायला मिळाली. दोन्ही नेत्यांकडून बारामतीकरांना भावनिक करण्यात आलं. अजित पवार गटाकडून बारामतीचा दादा एकच तर शरद पवार गटाकडून बारामतीचा नवा दादा युगेंद्रदादा असं सांगण्यात आलं. बारामती अजितदादांचीच अन् बारामतीचा दादा एकच हे अजित पवारांनी या निवडणुकीतून सिद्ध करुन दाखवलं आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीपासून बारामतीचा दादा बदणार असा सूर काहीसा उमटत होता. तर दुसरीकडे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं काही बारामतीकरांनी म्हणणं होतं. त्याप्रमाणे बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे तर विधानसभेला अजित पवार यांच्या हाती पुन्हा एकदा बारामतीचं प्रतिनिधित्व दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांमधून धडा घेत अजित पवारांनी शरद पवारांवर फारशी टीका केली नाही. बारामतीचा शहरी मतदार अजित पवारांच्यासोबत दिसला तर ग्रामीण भागात आजही शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने लोकांमध्ये नाराजी होती. त्यांनी ती मतदानातून व्यक्त केली. मात्र, अजित पवारांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरुन बारामतीकरांनी अजित पवारांची साथ दिल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?
-‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ
-Kasba Vidhansabha: मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला
-पुण्यात महाविकास आघाडीच्या पदरी एकच जागा; कोणाच्या गळ्यात विजयाची माळ? पहा एका क्लिकवर
-चंद्रकांत पाटलांनी कोथरुडचा गड कायम राखला; पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विरोधकांना दाखवलं आसमान