बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५३ हजार ९६० मताधिक्य मिळवत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे या निवडून आल्या आहेत. यानंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. विजयानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
सुप्रिया सुळे यांनी मतदानाच्या दिवशीदेखील अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर आता विजयानंतरही सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या मातोश्रीची घेतली आहे. त्यावर ‘काकींची भेट ही राजकीय नाही. तर, आशा काकींचा आशीर्वाद घ्यायला आले होते’, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत बारामतीमध्ये कमी पडल्याचे सांगितले. विधानसभेची रणनीती आता आखली जाणार असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीवरुन अनेक चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोकणात जाऊन काही लोक…’; वसंत मोरेंचा मनसेला खोचक टोला
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा
-ठरलं तर! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी होणार विराजमान
-“‘त्या’ दडपशाहीला मतदारांनी नाकारले”; लोकसभा निकालनंतर सु्प्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा