पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. बारामतीमध्ये प्रथमच पवार विरुद्ध पवाप सामना रंगणार आहे. यामुळे राज्यातील जनतेचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या ३ ही पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांनी मार्केटयार्ड येथे फळभाज्या विक्री करण्यासाठी येणार्या शेतकर्यांशी संवाद साधला आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुण्यात पत्रकाराशी संवाद साधताना ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ यांच्यात फरक असल्याचं वक्तव्य करत सुनेत्रा पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळला आहे. अजित पवार गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता सुनेत्रा पवारांनी थेट हात जोडले आणि उत्तर देणे टाळल्याचे पहायला मिळालं आहे.
आजपर्यंत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला. आता स्वतः साठी प्रचार करित आहात त्या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “ज्यावेळी स्वतः साठी प्रचार करावा लागतो. त्यावेळी जबाबदारीची भावना असते. प्रत्येक मतदाराकडे जाऊन आपल्याला मतदान करावे असे आवाहन करून, त्यांच्यामध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण करण्याचे काम केले जाते.”
महत्वाच्या बातम्या-
-“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल
-सुनेत्रा पवारांची प्रचारसभा घेणार का? राज ठाकरे म्हणाले, ‘मी महायुतीच्या …’