इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये उपुमख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मेळावा आयोजित केला होता. त्यांच्या या मेळाव्यात भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणातून जोरदार टोला लगावला आहे.
“तालुक्यात पोलीस त्यांचे काम चोखपणे करतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव आणला जातो. खोट्यानाट्या केस टाकल्या जातात. जर एखाद्याचं चुकलं असेल तर जरुर गुन्हा दाखल करावा. पण एखाद्या व्यक्तीला मारहाण होते आणि मारहाण करणारा व्यक्तीच अगोदर जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतो. अशा वेळी पोलिसांना वरुन कोणाचा फोन येतो. वरुन येणारा हा फोन बंद करण्याचे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे”, अशी विनंती हर्षवर्धन पाटलांनी केली आहे.
भाजपच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हे जुन्या वादाला विसरुन अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना साथ देतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, भर मेळाव्यातही हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नसल्याचं पहायला मिळालं आहे.
“अजित पवारांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर इंदापूरच्या जनतेने पाठिंबा द्यावा. बारामतीत फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांची नेमकी किती ताकद आहे, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमचे चार-पाच प्रश्न आहेत. ग्रामपंचायतीमधील आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही. सरपंच अवैध ठरवले जातात. आम्ही गावांमध्ये मतं मागायला जातो, तेव्हा लोकांना काय सांगणार? इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचार वाढला” असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल
-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…
-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा