पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ मे रोजी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरुर लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाच्या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. पैसे वाटपाचे प्रकार, मतदान प्रक्रियेते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. असे अनेक अनुचित प्रकार रोखण्यासाठी पुणे आयुक्तालयाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तेव्हा शरद पवारांच्या अंगावरून साप गेला अन् आठ दिवसांनी…’; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण
-मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने
-‘रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा’; भाजपच्या रासनेंची अनोखी ऑफर