पुणे : बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीची हत्या केली, मृतदेहाचे तुकडे करुन सूटकेसमध्ये भरले. सूटकेस बाथरुमध्ये ठेवली आणि पती पुण्याला पळून आला. बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करुन पुण्यात आलेल्या आरोपीच्या अखेर सातारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्नीची हत्या केल्याचे त्याने घरमालकाला फोन करुन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला साताऱ्यातून अटक केली आहे.
साताऱ्याची गौरी सांबरेकर (वय ३२) आणि पुण्याचा राकेश खेडेकर (वय ३६) असे या पती-पत्नीचे नाव आहे. गेल्या महिनाभरापूर्वीच मुंबईत राहत होते. त्यानंतर हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. तिथे त्यांचे दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. रागात राकेशचा संयम सुटला आणि त्याने गौरीला सुरीने दोन-तीन वेळा भोसकले. यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने गौरीचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये टाकला. यानंतर राकेश पळून पुण्यात आला होता.
पुण्याला आल्यानंतर राकेशने बुधवारी बंगळुरुमधील घरमालकाला फोन केला. ‘मी पत्नी गौरी सांबरेकर हिची हत्या केली असून तिचा मृतदेह फ्लॅटमधील सुटकेसमध्ये भरला आहे’, असे सांगितले. घाबरलेल्या घरमालक लगेच फ्लॅटवर गेला. तेव्हा फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. घरमालकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा राकेश खेडेकर याचा मोबाईल सुरु होता. बंगळुरु पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने राकेश खेडेकर याला गाडी चालवत असताना ताब्यात घेतले. राकेशला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी तो झुरळ मारण्याचे औषध प्यायला होता. त्यानंतर त्याची थोडीफार चौकशी करण्यात झाली. त्याने पत्नी गौरीची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या राकेशवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राकेशने गौरीच्या हत्येचे नेमके कारण अद्याप सांगितलेले नाही. आमच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले, एवढेच तो सांगत आहे. या घटनेनंतर राकेशला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तो फारसे बोलत नाही. आम्ही त्याची चौकशी करुन माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता
-वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ