पुणे : पुणे शहरात आता एका रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधारकार्ड काढले अन् जमीन विकत घेतल्याचे समोर आले आहे. म्यानमारहून बांग्लादेशात आणि त्यानंतर पुणे शहरात आलेल्या या रोहिंग्याने आता पुण्यात घर बांधून संसारही थाटला आहे. मुजल्लीम खान नावाच्या या रोहिंग्या व्यक्तीवर पोलिसांनी जुलै महिन्यात कारवाई देखील केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांने बनावट कादपत्रांच्या आधारे हा पराक्रम केल्याचे समोर आले आहे.
जुलै महिन्यात ४ रोहिंग्या म्यानमारमधून बांग्लादेशात आणि नंतर पुण्यातील देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आले. हे चारही रोहिंद्या पंडित चाळीत बेकायदाशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली.
या चार रोहिंग्यांपैकी एक असलेल्या मुजल्लीम खान यांने पुण्यात ८० हजार रुपयांमध्ये जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला. बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मुजल्लीम खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून ८० हजार रुपयांना ६०० चौरस फूट जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी घर बांधून संसार करु लागला आहे. अखेर या बेकायदा कृत्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं
-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पिंपरी-चिंचवडमधील लाखो ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज बाद
-‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे हटवा’ शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी, ‘तो’ नेता कोण?
-विजयानंतर हेमंत रासनेंनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आभार; ९० हजार नागरिकांना वाटले पेढे