पुणे : पुणे शहरामध्ये कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताबाबत महत्वाची बातमी आता समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला आहे. ‘या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच’ असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मृत मुलांच्या पालकांना आशवस्त केले आहे.
पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला.
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील सर्व… pic.twitter.com/YaJkTKL0lc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2024
पुण्यातील पोरशे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही मृत मुलांच्या पालकांना १० लाखांचा धनादेश देण्यात आला. मात्र, आज अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे देखील निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-व्हायरल व्हिडीओनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; एफसी रोडवरील ‘त्या’ बारचे लायसन्स रद्द
-चहा, कॉफीचे शौकीन आहात? तुम्हाला चहा, कॉफी पिल्याने होणारे ‘हे’ तोटे माहिती आहेत का?
-Pune Hit & Run: पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
-पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन धंगेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई म्हणजे..’
-‘पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा’; राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची आक्रमक भूमिका