पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता या अपघात प्रकरणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “डान्सबार, पब यामध्ये जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा आहे. हे लोक पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरले आहेत. याचे अधिकारी आणि नेत्यांनी काहीच पडले नाही”, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
“पैशाच्या भरोशावर लोकशाही घेतली जात असेल, मते खेचली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या मरणाला काही अर्थ नाही. बेदरकारपणे कार चावलणे चुकीचे आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरले आहेत”, असे म्हणत बच्चू कडू यांनी संतप्त व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरुन बरंच राजकारण तापलं आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलने केली. पुणे पोलिसांनी पैसे खाल्याचा आरोप केला आहे. त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. पुणे सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर तसेच पुणे पोलिसांवर सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’
-अक्रोड खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अक्रोडाच्या सेवनाचे उन्हाळ्यात होतो अधिक फायदा
-Pune Hit & Run: नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला घरात डांबलं, आता पोलिसांनी आजोबालाच….
-ब्रेकिंग: हिट अँड रन प्रकरणातील दिरंगाई भोवली, येरवडा पोलीस ठाण्यातील २ अधिकारी निलंबित