पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुद्धेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये हायव्होल्टेज लढाई पाहायला मिळतेय. अमोल कोल्हे यांनी प्रचारावेळी बोलताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यावर टीका केली होती. आता बेनके यांनी पलटवार करत अमोल कोल्हेंच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. तुमच्या भाषणाचे मोदींनी कौतुक केले हे किती दिवस सांगणार? आज आमच्यावर टीका करताय, मात्र भाजपमध्ये प्रवेशासाठी दिल्लीत अमित शहा यांच्या बाजूला किती दिवस पिंगा घातला हे माहीत आहे, अशी टीका बेनके यांनी केली आहे.
“अमोल कोल्हे हे किती दिवस मोदींनी भाषणाचे कौतुक केले याच्या पदराआड लपणार आहेत? मोदी साहेबांनी संसदेच्या भाषणाचे कौतुक केलं असे तुम्ही म्हणताय मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस अमित शहांच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला माहीत नाही का? परंतु खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर मतदारसंघांमध्ये आपली किती उपस्थिती होती? कुठल्या गावात किती काम केली? त्याचे शंभर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही ज्या ज्या गावांमध्ये जाऊन भाषण करताय, त्या गावात तुम्ही गेल्या पाच वर्षात एकदाही आलेले नव्हता, तुमचा शून्य रुपयांचा निधी या
गावांना मिळाला. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधीचे काम हे जनतेच्या विकासाचे असते, विकासकामे करायची नाहीत आणि इतर गोष्टींच्या गप्पा हणायच्या, त्याला लोक भूलनार नाहीत”, असा टोला बेनकेंनी कोल्हेंना लगावला.
दरम्यान, लोकांना केवळ गोडगोड बोलणारा नाहीतर काम पाहिजे, लोकांना अडीअडचणीला धावून येणारा आणि काम करणारा प्रतिनिधी हवाय, त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील, हे घड्याळाच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही बेनके यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“महायुतीच्या विजयात भोर तालुक्याची मोलाची भूमिका”; सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर
-महापालिका इन अॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी