पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीची एकनाअनेक घटना समोर येत आहे. पुणे शहरातील गुन्हेगार काही थांबताना दिसत नाही. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे.
पार्किंगच्या वादातून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, १० ते १५ जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. ज्यात गाडीच्या काच्या फोडण्यात आल्या.
महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. ज्यात चारचाकी गाडीचा सीट जळाले असून, महिला सुदैवाने वाचली आहे. जर महिला घरात पळून गेली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपला विजयाचा आत्मविश्वास राहिला नाही, नेत्यांमध्ये अहंकार वाढला’; सुप्रिया सुळेंचा आरोप
-शिरुरच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा! आढळरावांनी अजितदादांना ठणकावून सांगितलं
-‘राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, मी कुटुंबात राजकारण आणत नाही’; सुप्रिया सुळेंचा पलटवार
-धक्कादायक! पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी
-पुणे लोकसभा उमेदवारीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?