पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या नाना काटेंचं भवितव्य ठरणार आहे. या बैठकीत अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत.
‘अजित पवारांशी माझं बोलणं झालेलं आहे, अजित पवार माझ्यासाठी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चिंचवड विधानसभेची मागणी करणार आहेत. दादांनी सांगितलं आपण चिंचवड विधानसभेची जागा मागणार आहोत. तू तुझ्या पध्दतीने नागरिकांशी संवाद साध, तयारी कर असं अजितदादांनी सांगितलं आहे’, असे नाना काटे म्हणाले आहे.
‘चिंचवडची जर ही जागा राष्ट्रवादीला सुटता, भाजपला सुटली तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे. ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना शिंदे गटाला न मिळता भाजपला मिळाली तरी मी ही निवडणूक पक्ष चिन्हावर निवडणूक लढणार आहे, मी दादांशी याबाबत बोलेन, भाजपला ही जागा मिळाली तर माझ्यासाठी इतर पक्षांची देखील पर्याय आहे. त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’, असे नाना काटे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-”लाडकी बहिण’साठी शिक्षक, गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक संकटात टाकलं’; राज्य सरकारवर गंभीर आरोप
-कामाच्या अति तणावामुळे पुण्यात २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘मला आशा आहे की,…’
-महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन
-शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबच्या चर्चेवर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘मी शरद पवारांना…’