पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींना चांगलाच रंग आला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये असल्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे. इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकते.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकण्याचं निश्चित केलं आहे. आता, पुढील ४ ते ५ दिवसांत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी स्टेटसला तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याचे दिसून आले आहे.
‘आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा’, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात काही दिवसांपूर्वीच झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील.
महत्वाच्या बातम्या-
-प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक; नेमकं कारण काय?
-वडगाव शेरी विधानसभा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढणार!
-बालेकिल्ल्यात अजितदादांना आणखी एक मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं साथ सोडताच केली जहरी टीका
-नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?