पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली ज्यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाली. भाजपची यादी जाहीर झाली अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजप नेत्यांची गर्दी झाली आहे.
खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर तसेच मावळ मतदारसंघातून आमदार सुनील शेळकेंविरोधात इच्छूक असणारे भाजपचे बाळा भेगडे यांनी देखील देवेंद्र फडणीवसांच्या भेटीला पोहचले आहेत. पहिल्या यादीत नाव आले नसल्याने हे नेते फडणवीसांच्या भेटीला पोहचले आहेत.
महाराष्ट्रातील जे संघटनात्मक दृष्टीने कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मतदारसंघ ओळखले जातात त्यामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला जातो. महायुती म्हणून जागा वाटपामध्ये जे काही ठरेल त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अद्याप मावळच्या जागेबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. मावळची जागा शंभर टक्के भाजपला मिळेल. भाजपच्या माध्यमातून जो काही आमचा पक्ष निर्णय करेल त्याच्यासाठी आम्ही आशावादी आहोत, बाळा भेगडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट
-उमेदवारी जाहीर होताच महेश लांडगेंनी २ माजी महापौरांसोबत ठोकला शड्डू
-चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर; म्हणाले, ‘आमच्यात उमेदवारीवरुन वाद नव्हता’
-नागरिकांना प्रलोभन अन् आमदारांना दिवाळी किट वाटपाची घाई; धंगेकरांवर गुन्हा दाखल