पुणे : पुण्यातील मनसेतून लोकसभा निवडणुकीपुर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करुन पुण्याची लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी आज शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
वसंत मोरे येत्या ९ तारखेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबद्दल आज मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी आगामी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहे. ‘पुण्यातील २ मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला आहे. मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक वंचितकडून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुढील राजकीय वाटचाल मोरे हे ठाकरे गटातून पार पाडणार आहेत’, असे वसंत मोरे म्हणाले आहे.
‘विधानसभा निवडणुकीसाठी मला २ पर्याय आहेत. आगामी निवडणूक खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे’, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अटकेची माहिती लपवली; नेमकं कारण काय?
-महायुतीत इंदापूरच्या जागेवरुन वाद?; हर्षवर्धन पाटील अन् दत्ता भरणेंमध्ये बॅनर वॉर
-पुण्यात झिकाची रुग्णसंख्या वाढतेय; श्रीनाथ भिमालेंचं पालिका आयुक्तांना निवेदन
-अजितदादांनी जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण योजने’वर दादांच्या लाडक्या बहिणीची टीका
-‘विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या…’; अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल