पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आज मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एका बाजूला या घडामोडी सुरू असताना आता महायुतीमध्ये काही जागांवर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांची, इच्छुकांची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे.
भाजपने पुण्यातील ३ जागांवर उमेदवार जाहीर केले असून अद्याप ३ जागांवर उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. वडगाव शेरीची जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतो, अशा चर्चा सुरु झाल्या असून वडगाव शेरीत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरेंनी आज पक्षाध्यक्ष अजित पवारांची ‘देवगिरी’वर भेट घेतली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी आलेले सुनील टिंगरेंनी अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोपामुळे टिंगरे चांगलेच अडचणीत आले होते. यावरुन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांनी देखील कार्यकर्ता मेळाव्यातून टिंगरेंना टार्गेट केलं होतं. टिंगरेंना उमेदवारी दिली तर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचं विरोधी पक्ष भांडवल करतील, अशी शक्यता भाजपच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे सुनील टिंगरेंनी आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळणार की मतदारसंघ भाजपकडे जाणार? हे पाहणंं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उमेदवारी जाहीर होताच महेश लांडगेंनी २ माजी महापौरांसोबत ठोकला शड्डू
-चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर; म्हणाले, ‘आमच्यात उमेदवारीवरुन वाद नव्हता’
-नागरिकांना प्रलोभन अन् आमदारांना दिवाळी किट वाटपाची घाई; धंगेकरांवर गुन्हा दाखल
-Assembly Election: काँग्रेस भवनात आघाडीच्या नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले, ‘निष्ठावंतांना…’