पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आज उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. अशातच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज खरेदी केला आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरुन महायुतीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहून टिंगरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, टिंगरेंनी पराभूत केलेले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास आग्रही आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने मुळीकांनी मतदारसंघात तशी तयारी देखील केली आहे.
भाजपकडून जगदीश मुळीक यांना भाजपकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुळीकांना उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली. मात्र, यामध्ये सुनील टिंगरेंचे नाव नसल्याने मुळीकांच्या आशा पल्लवीत झाल्या तर सुनील टिंगरे अद्यापही उमेदवारी मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे पहायला मिळत आहे. वरिष्ठ पातळीवर वडगाव शेरी मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार
-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?
-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर
-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ
-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?