पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप झालेले नाही. अनेक जागांवर महायुतीमध्ये जागांवरुन तिढा निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘युतीतील हा तिढा बहुतांश सुटला असून थोडा बाकी आहे. तो सुद्धा लवकरच सुटेल’, असे सांगितले असून अजित पवारांनी बारामतीमधून लढण्याबाबतही पेच वाढवला आहे.
‘बारामतीतून निवडणूक लढणार की नाही, यावर महायुतीत ही जागा कोणाला सुटते आणि पक्ष काय निर्णय घेतो, त्यानुसार उमेदवार दिला जाईल’, असं म्हणत अजित पवारांनी बारामतीमधून निवडूक लढवण्याबाबत सस्पेन्स वाढवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार बारामतीमधून लढणार की नाही, अशी चर्चा सुरु होती.
दरम्यान, मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार बारामतीमधूनच लढणार असे सांगितले. याच दिवशी अजित पवारांकडे एक कार्यकर्ता उमेदवारीची मागणी करताना ‘मी मंत्री असून माझ्या उमेदवारीचं फिक्स नाही आणखी,’ असं म्हणाले होते. त्यातच आज अजित पवारांच्या बारामतीमधून लढण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता चांगलाच सस्पेन्स वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…
-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?
-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा
-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!