पुणे : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. वडगाव शेरीची जागा भाजपला सुटत नसल्याचे दिसताच भाजपचे बडे नेते बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हाती घेतली. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू आहे. आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे.
शिंदे गटाचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पुण्यातील ८ पैकी हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या तीन मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला आहे. या तीनही मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आली नव्हती. मात्र, आता शिवसेनेला कमीत कमी ३ जागा सोडाव्यात, अशी मागणी आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. या ३ जागा मिळवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे. या जागा आम्हाला मिळतील’, असे नाना भानगिरे म्हणाले आहेत. त्यामुळे आधीच भाजप राष्ट्रवादीत वाद सुरू असल्याने आता शिवसेनेने सुद्धा दावा केल्यामुळे महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. वडगाव शेरी हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वडगाव शेरी या ठिकाणी सेनेचे काही नगरसेवक आहेत आणि हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे त्यामुळे आम्ही या जागेचा दावा सोडणार नाहीत’, असेही नाना भानगरे म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असताना भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी दंड थोपटले आहे. जगदीश मुळीक यांनी मतदारांना आवाहन करणारे एक भावनीक पत्र लिहले आहे. आधीच जगदीश मुळीक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या दाव्याने मतदारसंघात आणखी काय राजकीय राडा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीपूर्वीच शिरुरमध्ये राडा; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत ‘अशोक पवार चोर है’चा नारा
-..अन् बघता बघता महापालिकेचा ट्रक गेला थेट खड्ड्यात; नेमका काय प्रकार?
-आयफोन प्रेमींसाठी खूशखबर; आता घरबसल्या अवघ्या १० मिनिटात आयफोन १६ मिळणार हातात, कसा ते वाचा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’