बारामती | पुणे : बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीसारखाच आता विधानसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार सामना पहायला मिळणार आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी “पवार साहेबांनी तात्याराव पवारांचं घर फोडलं का?” असा सवाल करत शरद पवारांवर शरसंधाण साधले आहे. यावरुन आता ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
“माझ्या आईने माझ्या दादांच्या विरोधात (अजितदादा) अर्ज भरु नको, असे सांगितले होते. पण तरीही त्यांनी अर्ज भरला. त्यांना विचारलं कुणाच्या सांगण्यावरुन फॉर्म भरला, तर म्हणतात साहेबांनी सांगितलं…मग आम्ही असे म्हणायचं का साहेबांनी आमचं तात्या साहेबांचं घर फोडलं का?” असेही अजित पवार काल म्हणाले होते.
शरद पवारांचं प्रत्युत्तर
“घर फोडण्याचं पाप माझ्या भावांनी मला शिकवलं नाही. त्यांना माझ्याकडून अंतर होणार नाही,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना खडसावलं आहे. बारामतीमधून ४ वेळा उपमुख्यमंंत्री झालात मग आता भाजपची मदत का घेतली? असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांना केला आहे. तसेच ‘हातात सत्ता असताना सुप्रिया सुळेंना कोणतंही पद दिलं नाही’, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सोमवारी बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार आहे. तसेच दोन्ही गटाकडून बारामतीकरांना भावनिक करण्यात येत आहे. लोकसभेला बारामतीकरांनी शरद पवारांची साथ दिली. आता या निवडणुकीत बारामतीकर कोणाची साथ देतात हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा
-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट
-भाजपचे मुळीक गेले उमेदवारी अर्ज भरायला, फडणवीसांचा फोन आला अन् मुळीकांनी घेतला यु-टर्न
-काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे