पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. हळूहळू उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. महायुतीतील भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पुण्यातील कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे या तिन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे.
विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपले दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली. ‘घरातच तिकिट मिळालं आहे.घरापासूनच आता प्रचाराला सुरूवात करायची आहे. त्यामुळे खंत नाही, वाद नाही. मी आधीही सांगितलं होतं ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करेन’, असे अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत. आता अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे एकत्र प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सन्माननीय पक्षश्रेष्ठींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय… pic.twitter.com/GfwL5A4yJa
— Shankar Jagtap ( Modi ka Parivar) (@iShankarJagtap) October 20, 2024
“आमच्यामध्ये कौटुंबिक किंवा राजकीय असा कोणताच वाद नव्हता. आमचं एकत्र कुंटूब आहे, होतं आणि ते कायम राहणार आहे. मी माझी उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. अनेक इच्छुकांमध्ये माझी निवड केली, काही इतर उमेदवार देखील इच्छुक होते, आताही आहेत. महायुतीत बंडखोरी होणार नाही. सर्वजण एकत्रित येऊन आम्ही लढू. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आधीपासून काही ठरवलेले नियम होते, ज्यांच्याकडे जो मतदारसंघ होता, त्यांना त्या जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी होऊ न देता सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नागरिकांना प्रलोभन अन् आमदारांना दिवाळी किट वाटपाची घाई; धंगेकरांवर गुन्हा दाखल
-Assembly Election: काँग्रेस भवनात आघाडीच्या नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले, ‘निष्ठावंतांना…’
-आजवर साथ दिली आता उमेदवारी द्या, कसब्यात मुस्लिम समाज आग्रही; थेट घेतली प्रभारींची भेट
-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती