पुणे : चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या शंकर जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप हे उपस्थित होते. शंकर जगताप यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शंकर जगताप यांनी बंडखोरी करत नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल यावर प्रतिक्रिया दिली असून राहुल कलाटेंवर जोरदार टीका केली आहे.
‘माझ्यासमोर तुल्यबळ असा उमेदवार नाही. शरद पवारांच्या पक्षातील कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असता तर ही लढत नक्कीच तुल्यबळ झाली असती’, असे म्हणत शंकर जगताप यांनी राहुल कलाटे यांच्यावर टीका केली आहे. राहुल कलाटेंसह महायुतीतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी करुन नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरही शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“नाना काटे यांच्यासोबत आम्ही उमेदवारी मागे घेण्यावरून बोलत आहोत. पक्षश्रेष्ठी देखील याबाबत तोडगा काढेल. नेहमी आम्ही दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यासाठी काम करतो. परंतु, वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यानंतर माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली. ती मी योग्य रीतीने पार पाडेल”, असं शंकर जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद