पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या चिंचवडमध्ये गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप भाजपच्या असल्यामुळे ही जागा भाजपकडे गेली. विधानसभा निवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. मात्र अद्याप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.
महाविकास आघाडीमध्ये चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, नाना काटे देखील इच्छुक आहेत. तर ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाली तर राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, ही जागा कोणाला मिळणार? यावर अनेक राजकीय समीकरणं अंवलबून आहेत. खासदार अमोल कोल्हे हे देखील राहुल कलाटेंना उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता भाजपच्या जगताप यांना चिंचवडमधून कोण टक्कर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार
-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?
-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर
-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ