पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेत यश मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु असतानाच राज्यातील सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे पक्ष एकत्रित येऊन येत्या निवडणुकीत तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न करत आहेत. गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेटे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, शंकरराव धोंडगे यांच्यासह प्रमुख शेतकरी संघटनांचे पदाधिकारी होते. यावेळी राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी तयार करत विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.
सत्तेवर येण्यासाठी नाही तर सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी या निवडणुका सर्व संघटना एकत्रित येऊन लढवणार आहे. निवडणुकीत आश्वासक चेहरा देऊन आणि व्यापक आघाडी करुन आम्ही सामोरे जाणार आहोत. त्यामध्ये माजी सैनिकांच्या संघटनेचाही समावेश असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
‘कोणाचीही सत्ता आली तरी शेतकर्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आम्हांला सत्ता नकोय, पंरतु सत्ताधार्यांवर अंकुश आणण्यासाठी आम्ही जनतेची ताकद उभी करुन चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत. माणसे घडविणे माझे काम असून ते मी करीत राहणार’, असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.
‘शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अपयशी ठरले आहेत. राज्यात महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडवले नाहीत. प्रस्थापितांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही’, असे सांगत मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत तिसऱ्या आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक भूमिका राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाविकास आघाडीत कोथरुडची जागा ठाकरेंकडेच; इच्छुकांपैकी कोणत्या शिलेदाराला मिळणार संधी?
-छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फुटी अश्वारूढ पुतळा; ‘शिवतांडव’चे सादरीकरण ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
-शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?
-पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम
-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली