पुणे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर वरिष्ठंकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निलंबनाच्या कारवाईवरुन पुण्याचे माजी उपमहापौर, पर्वती मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले आणि काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच आबा बागुल यांची प्रकृती ठीक नसूनही त्यांनी पत्रकार परिषद घेत निलंबनाच्या कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“मी हॉस्पिटलमध्ये आजारी असल्याने उपचार घेत असताना, तडकाफडकी माझे निलंबन करणे योग्य नाही. काँग्रेस पक्षाने निलंबनाच्या दोन याद्या का काढल्या. एक यादी पूर्वी काढली. त्यात माझे नाव नव्हते. नंतर दुसरी यादी काढली गेली, यात माझे नाव आले. प्रदेश कॉग्रेसवर कोणाचा दबाव होता?”, असा प्रश्न आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे.
“पक्षाच्या निलंबनाच्या दुसऱ्या यादीत आणखी नावे लिहिण्यासाठी काही स्पेस ठेवली आहे आणि त्यानंतर नाना गावंडे यांची सही आहे. नक्की यातून कोण काँग्रेस संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मी काँग्रेस विचाराचाच पाईक आहे. काँग्रेस पक्षाचाच एक निष्ठावंत आहे आणि माझ्याबरोबर अशी निलंबनाची कारवाई होत असेल. तर, माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचे काय? आपण मला वेळोवेळी २००९ पासून विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले. ते मी ऐकले व मागे हटलेलोही आहे. माझी संधी तीन वेळा हिरावून घेतली गेली आहे. जो पक्ष तीन वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघात हारतो, त्यांनाच पुन्हा पुन्हा हा मतदारसंघ सोपवला जातो, जो मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे हे कितपत योग्य आहे? अशावेळी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने करायचे काय? असा प्रश्न आबा बागुल यांनी पक्षाला विचारला आहे.
“निष्ठेची कदर होणार नसेल तर नवीन पिढी काँग्रेसकडे कशी येणार? याचा विचार करून आपण माझे निलंबन मागे घ्याल, असा मला विश्वास आहे. मी काँग्रेस पक्ष वाचविण्याकरिता व वाढविण्यासाठी हा प्रयत्न करत आहे. मी पक्षाच्या विरोधात लढत नाही. महाविकास आघाडी ही तोंडी आघाडी आहे. ही कुठेही अधिकृतरित्या आघाडी म्हणून नोंद केलेली नाही. उद्या आघाडीतील घटक पक्षांनी आपल्याला जर दगा दिला तर याला कोण जबाबदार असेल. यापूर्वीही पुणे महापालिकेत पुणे पॅटर्न झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि भाजप एकत्र आलेले आहेत”, याची देखील आबा बागुल यांनी आठवण करुन दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेत’; आबा बागुलांचा गंभीर आरोप
-‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद
-स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!
-‘चंद्रकांत दादांमुळे मुलींना मोफत शिक्षण’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांकडून कौतुक
-पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल