पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच आता भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याची स्पष्ट संकेत पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि स्थायी समितीचे सदस्य तसेच ३ टर्म नगरसेवक असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर यांनी दिले आहेत.
‘आपल्याला भाजपकडून शिवाजीनगर अथवा कोथरूडमधून उमेदवारी द्यावी. माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. वेळ पडल्यास अपक्ष देखील निवडणूक लढू,’ असा इशारा उज्ज्वल केसकर यांनी दिला आहे. यापूर्वी उज्ज्वल केसकर यांनी २ अनेकदा बंडखोरी केली होती. मात्र त्याचा त्यांना चांगलाच फटका देखील बसला होता.
उज्जव केसकर यांनी पुण्यातील कोथरुड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे, खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करणारं पत्र उज्ज्वल केसकर यांनी पाठवले आहे.
शिवेसना आणि भाजप महायुतीमध्ये असताना २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरुडची जागा शिवसेनेला देण्यात आली त्यावेळी केसकरांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, केसकर यांनी मोठा पराभव मिळाला. त्यानंतर २०१२ मध्ये पुणे पालिकेची निवडणुकीतही केसकर यांनी ‘पुणे जनहित आघाडी’ नावाचा पक्ष स्थापन करून लढवली अन् तेव्हा देखील अपेक्षित यश मिळालं नाही. केसकरांनी २०१४ मध्ये पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. मात्र, पुणे भाजपमध्ये ते सक्रिय नव्हते.
महत्वाच्या बातम्या-
-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर
-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना