पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोप करताना दिसू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव–कवठे महाकाळ येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली.
“माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर. आर. पाटलांनी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती”, असा दावा अजित पवार यांनी केला. या दाव्यावर आता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. मी कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी केली नाही, तसेच अजित पवारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेशही दिले नाहीत”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
“वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात अर्थखात्यानेच म्हटले होते की, मागच्या १० वर्षांत सिंचनावर ७० हजार कोटी खर्च झालेले आहेत, पण तरी प्रकल्प कार्यान्वित झाले नव्हते. त्यामुळे मी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. पण अजित पवारांना वाटले की, मी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले
-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा
-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट
-भाजपचे मुळीक गेले उमेदवारी अर्ज भरायला, फडणवीसांचा फोन आला अन् मुळीकांनी घेतला यु-टर्न
-काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे