पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटप होण्याआधीच पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पहायला मिळत आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना या जागेवर शिवसेना अन् भाजपने दावा केला आहे. चिंचवडमध्ये भाजपचे आमदार असताना राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत पिंपरी, चिंचवड विधानसभेवरुन नवा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे आमदार असताना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला पाहिजे’ असं म्हणत बनसोडेंवर लोक नाराज असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यातच कोणत्याही परिस्थितीमध्ये पिंपरीमध्ये कमळाच उमेदवार असावा, अशी मागणी भाजपची आहे.
त्यातच चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी बंड करण्याची भाषा केली आहे. ‘महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत चिंचवडची जागा भाजपला सुटल्यास त्यावेळी माझी भूमिका जाहीर करेन’, असे नाना काटे म्हणाले आहेत.
दरम्यान, पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्या तिन्हीही पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. या मतदारसंघांमध्ये येत्या काळात काय राजकीय गणितं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जनतेचं ठरलंय! वडगाव शेरीत मशालच…” ठाकरेंच्या शिलेदराचे झळकले बॅनर्स
-सुप्रिया सुळेंचं मिशन पिंपरी-चिंचवड; थेट अजिदादांना डिवचलं, म्हणाल्या ‘आधी शहराचा कारभारी…’
-पर्वतीसाठी बागुलांचा गनिमी कावा, काँग्रेस नेत्यांनंतर थेट शरद पवारांची भेट; नेमकं चाललंय काय?