पुणे : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. आज राज्यभरातून अनेक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आता निवडणुकीचे चित्र काहीसं स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे या आज पुणे दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ‘पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघ असून या २१ जागांवर महायुतीला विजय मिळेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘आम्ही सर्वजण विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागलो आहोत. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील २१ मतादारसंघांपैकी १८ जागा महायुतीकडे आहेत. मात्र, यावेळी २१ पैकी २१ जागा महायुतीकडे ठेवायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला थोडंसं यश कमी मिळालं आहे. मात्र, विधानसभेला २१ जागांवर यश मिळेल”, असा विश्वास पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला.
“हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे, आता महाराष्ट्रातही भाजप महायुतीला मोठं यश मिळेल. त्यानुसार, पुण्यातील ८ च्या ८ जागा आम्ही जिंकणार. एखादा निर्णय होत नाही, तोपर्यंत मागणी करू शकतात, तो भाजप कार्यकर्त्यांचा डीएन आहे. मात्र, निर्णय झाल्यावर ते पक्षासोबत असतात. महायुती म्हणून सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करणार आहेत”, असेही पंकजा मुंडेंनी सुचवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर
-‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक
-‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार
-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी
-शरद पवारांचा फोन तरीही तोडगा नाहीच, आबा बागुल पर्वतीतून लढणारचं; नेमकं काय घडलं?