पुणे : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती, महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच जागावाटपावरुन महायुतीत वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघावर आता भाजपने दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ ऑगस्ट रोजी भाजपने मेळाव्याचे आयोजन केले आहे.
ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती सोडायची असा साधा सरळ फॉर्म्युला महायुतीने ठरवला असतानाही मावळच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. मावळची जागा ही कमळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी भाजपने आग्रह धरला आहे. याच पार्श्वभूमीवर २ ऑगस्ट रोजी मावळ भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, जागावाटप होण्याआधीच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलेल्या जागेवरच भाजपने शड्डू ठोकल्याने आता मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची स्पष्ट चित्र दिसत आहे. यापुढे आता काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, “आगामी विधानसभेसाठी मावळ मतदारसंघातून भाजपनं निवडणूक लढवावी, अशी मागणी आम्ही आमच्या नेत्यांकडे करणार आहोत. तसेच, यंदाच्या विधानसभेसाठी कमळ चिन्ह हाच आमचा चेहरा असेल”, असे भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला होता”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
-शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप
-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप; प्रवाशांचे हाल
-‘दादा, परत शिवसेनेत या’; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना कळकळीची विनंती, अन्…