पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मित्रपक्षांकडून मतदारसंघांवर दावा केला जातोय. भाजपने (BJP) पुणे शहरातील वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सोडल्याचा चर्चेला जोर आला आहे. मंगळवारी पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेतून वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ वगळल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधानसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र, वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये उमेदवार निवडीची मतदान प्रक्रिया घेण्यात आली नाही. हे दोन मतदारसंघ भाजपने मित्र पक्षाला सोडल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी निरीक्षक पुण्यात असूनही त्यांनी हडपसर आणि वडगाव शेरीत बैठका घेतल्या नसल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे असल्यामुळे ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून या जागेवर महायुतीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढ्याच्या तयारीत आहेत. तर हडपसरमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आमदार आहेत. मात्र, हडपसरमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाना भानगिरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिंदेंच्या सेनेला सुटण्याची शक्यता आहे. नाना भानगिरे देखील निवडणुकीची जोरात तयारी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू