पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुण्यातील काँग्रेस भवन येथे तब्बल तासभर पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे उपस्थित होते.
‘विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींच्या सभा, मेळावे आणि रॅली होणार आहेत. त्या दृष्टीने चांगल्या प्रकारे चर्चा झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आम्ही सर्वजण येणार्या निवडणुकीसाठी तयार आहोत. जे निष्ठावंत आहेत आणि नागरिकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. अनेक विकासकामे केली आहेत. त्या इच्छुक मंडळांचा निश्चित विचार होईल, त्यामुळे शहरात दुसरे काही चुकीचे होईल, असे वाटत नाही. जे उमेदवार जिंकतील, अशा नेत्यांना निश्चित उमेदवारी दिली जाईल’, असा विश्वास यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, निवडणूक तोंडावर आली असून अद्याप अंतिम जागावाटप झाले नाही. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची रीघ लागली आहे. त्यातच वरिष्ठांकडून इच्छुकांच्या मुलाखती देखील झाल्या आहेत. प्रशांत जगताप हे हडपसरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आजवर साथ दिली आता उमेदवारी द्या, कसब्यात मुस्लिम समाज आग्रही; थेट घेतली प्रभारींची भेट
-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती
-Assembly Election: खडकवासल्याच्या राजकारणात नवी खेळी; अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड
-काँग्रेसला जिंकायचाय पारंपारिक मतदारसंघ, पण अंतर्गत वादाचा होणार भाजपला फायदा?
-भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नांची राख; अभ्यासिकेला आग, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले