पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून पहिल्या उमेदवार याद्या जाहीर झाल्या. भाजपच्या ९९, शिवसेनेच्या ४५ तर राष्ट्रवादीच्या ३८ उमेदवार यादी जाहीर झाल्या आहेत. पुण्यातून भाजपचे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे या ३ विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये पुण्यातून आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, मावळमधून सुनील शेळके, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते, बारामतीमधून अजित पवार, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि हडपसरमधून चेतन तुपे अशा ८ जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता नुकतीच महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर केलेल्या उमेदवार यादीत पुण्यातून एकाही जागेवर उमेदवार घोषित करण्यात आला नाही. कोथरुडच्या जागेवर शिवसेनेकडून उमेदवार घोषित होण्याची अपेक्षा होती. मात्र येथूनही कोणाचे नाव जाहीर केले नाही. तसेच ठाकरे सेनेने हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी मतदारसंघावर दावा केला होता. यापैकी कोणत्याच मतदारसंघावर अद्याप कोणत्या पक्षाकडे जाणार यावर शिक्कामोर्तब झाला नाही. तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अद्याप एकही उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला पुण्यात उमेदवार ठरेना अशी अवस्था असून महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. आघाडीत कोणाकोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?
-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!
-राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा
-Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत
-अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच