पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात महायुतीला तर फटका बसलाच मात्र, सर्वात मोठा धक्का हा भाजपला बसला. आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे फटका बसू नये यासाठी भाजपने महाराष्ट्रात कंबर कसली आहे.विधानसभेत महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपने गुजरातची मदत घेतल्याचे समोर आले आहे.
मध्यप्रदेशनंतर आता गुजरातचे काही नेते, मंत्री महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मर्जीतील हे सर्व नेते नाशिकमध्ये दाखल झाले असून या आजी, माजी मंत्र्यांनी नाशिकमध्ये मतदारसंघांचा आढावा घेणारी बैठक घेत आहेत. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी गुजरात भाजपला मदत करत आहे.
महाराष्ट्रात दाखल झालेले गुजरातचे हे नेते मतदारसंघानिहाय आढावा घेत आहेत. राज्यातील तब्बल ४८ मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गुजरातच्या या नेत्यांना जशी ४८ मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली तशीच इतर राज्यातील नेत्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; आपल्या दोन्ही लेकरांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमीची पायपीट
-‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड
-गणेशोत्सवात आवाज कमी; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन