पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पुणे शहरात वातावरण भक्तीमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून इच्छुकांनी साखर पेरणी सुरू केलीय. पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागुल हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देण्याच्या निमित्ताने बागुल यांची प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे घरच्या गणपतींचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने थेट नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला जात आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागा वाटपात आजवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. 2009 मध्ये खुल्या झालेल्या या मतदारसंघात गेली तीन टर्म राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची आग्रही भूमिका मांडली जात आहे. गेली सहा टर्म पासून पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेले माजी उपमहापौर आबा बागुल हे पर्वतीतून लढण्याची तयारी करतायत. बागुल यांनी काँग्रेस नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत मतदार संघातील गणित मांडल आहे. पक्षीय पातळीवर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मतदार संघामध्ये देखील आबा बागुल यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आबा बागुल यांनी मतदारसंघातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत बागुल यांनी आपल्या प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण केलीय. आजवर संधी न मिळाल्याने बागुल यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही. मात्र यंदा काही झालं तरी आपण निवडणूक लढणारच यावर ते ठाम आहेत. पक्ष नेतृत्वाकडून देखील त्यांना काम करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. आता सण उत्सवाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क वाढवण्यावर त्यांच्याकडून भर दिला जातोय.
महत्वाच्या बातम्या-
-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप
-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला पुणे दौऱ्यावर; ‘या’ मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन
-Assembly Election: महाविकास आघाडीत रस्सीखेच; पुण्यातील ८ जागांवर ठाकरे गटाचा दावा
-‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा