पुणे : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. काही मतदारसंघांमध्ये नागरिकांवर प्रभाव पाडण्यासाठी इच्छुकांकडून विविध प्रलोभने दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये देखील कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून नागरिकांवर प्रभाव पाडण्यासाठी दिवाळी कीटचे वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्या किटचा टेम्पो पकडून थेट पोलीस ठाण्यात नेल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून नागरिकांना प्रलोभन दाखवत दिवाळी कीटचे वाटप आचारसंहिता सुरू असताना देखील केले जात होते. विविध साहित्याने भरलेले किट कसबा मतदारसंघात वाटप केले जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी टेम्पो पकडला. हा टेम्पो थेट समर्थ पोलीस ठाण्यात घेऊन जात धंगेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र रात्री उशिरा धंगेकर यांच्यासह एका व्यक्तीवर आदर्श आचारसंहिताभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीने हे किट वाटप केले जात होते. पिशवीवर धंगेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे चिन्ह सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील छापण्यात आले होते. हा प्रकार पुढे आल्यानंतर धंगेकर यांच्याकडून सारवासारव करत गेली अनेक वर्षांपासून दिवाळीमध्ये हे कीट वाटप करत असल्याच सांगण्यात येत आहे. परंतु आचारसंहिता लागू असताना देखील अशा पद्धतीने नागरिकांना प्रलोभन देणे कायद्याने गुन्हा असल्याचे आमदार धंगेकर यांना माहित नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: काँग्रेस भवनात आघाडीच्या नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले, ‘निष्ठावंतांना…’
-आजवर साथ दिली आता उमेदवारी द्या, कसब्यात मुस्लिम समाज आग्रही; थेट घेतली प्रभारींची भेट
-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती
-Assembly Election: खडकवासल्याच्या राजकारणात नवी खेळी; अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड
-काँग्रेसला जिंकायचाय पारंपारिक मतदारसंघ, पण अंतर्गत वादाचा होणार भाजपला फायदा?